आता फेरीवाल्यां विरोधात पुण्यातही मनसेचे खळखट्याक

टीम महाराष्ट्र देशा –एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत. आता मुंबई पाठोपाठ पुण्यातही परप्रांतीय अनधिकृत फेरीवाले मनसेच्या टार्गेटवर आले आहेत.

दरम्यान मनसेकडून पुढील दोन दिवसांत शहरातील अनधिकृतफेरीवाल्यांवर कारवाई करण्याच पत्र महापालिकेला देण्यात आलं असून पालिकेकडून कारवाई न झाल्यास खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला आहे.

पुण्यात देखील फेरीवाल्यांचे मोठे जाळे आहे फेरीवाल्यामुळे वाहतुकीच्या अनेक समस्यांना सामोर जावे लागते. फेरीवाल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर फार गर्दी होते. त्यामुळे फेरीवाल्यावर योग्य कारवाई करणे गरजेचे आहे.मनसे दिलेल्या इशार्यानंतर पुणे पालिका फेरीवाल्यांच्या विरोधात काय कारवाई करते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.