नांदेड : कंधार येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मेहुण्या मेहुण्यांच्या कार्यकर्त्यांत तुफान राडा झालाय. यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमास खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना निमंत्रण नसल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे यांना जाब विचारत राडा घातला.
नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय भूमिपूजन सोहळा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. शासकीय कार्यक्रमात नांदेड व लातूरचे खासदार व मुखेडच्या आमदारांची नावे नसल्याने भाजप कर्यकर्त्यांनी जाब विचारताच आमदार श्यामसुंदर शिंदे व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने कार्यक्रमात राडा झाला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून निषेध केला.
कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड व शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार यांनी नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे व कंधार-मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांची नावे प्रोटोकॉलनुसार नसून त्यांना निमंत्रणही नसल्याचे प्रशासनास निदर्शनास आणून दिले. तसेच लोकप्रतिनिधी नसलेल्या आशाताई शिंदे यांचा फोटो फलकावर का लावला? अशी विचारणा केली.
यावेळी आमदार शिंदे यांनी उडी घेत भाजप तालुकाध्यक्ष भगवान राठोडसह कार्यकर्त्यांना उर्मट भाषा वापरली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकाच गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी बाळाचा वापर करून भाजप कार्यकर्त्यांना बाहेर काढले. शासकीय कार्यक्रमात झालेल्या या राड्यावरून परस्परविरोधी तक्रारी नुसार कंधार पोलिसात कलम 143,147,149,152,353,कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भीती आमच्या रक्तात नाही-भगवान राठोड
प्रोटोकाल बाबत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना आमदार शिंदे मध्येच उठून तू कोण विचारणार ? तुला बघून घेईन, अशी असंवैधानिक भाषा वापरली. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारायचा हक्क हे आमदारांना कदाचित माहीत नसेल. मी तांड्यावरचा लेकरू आहे. भीती आमच्या रक्तात नसते. त्यामुळे आमदारांनी अशी असंवैधानिक भाषा वापरून धमकी देऊ नये. भाजप याचा निषेध करते, असे भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सत्तेसाठी भाजप नेत्यांची धडपड सुरू’, अशोक चव्हाणांची टीका
- ‘जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?’, भाजप आ.अतुल भातखळरांचा सवाल
- अण्णा पुन्हा दिसणार; ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिका लवकरच येणार भेटीला
- आपल्या वैचारिक परंपरेशी प्रामाणिक न राहणारा पक्ष राजकारणात टिकू शकेल का ?
- अक्षय कुमार दिसणार पुन्हा एकदा खाकीत! साऊथच्या ‘या’ रिमेकमध्ये झळकणार