औरंगाबादेत मनपाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे, पाणी समस्या कायमची सुटेल!

औरंगाबाद : सध्या शहरात प्रचंड पाणीटंचाई आहे. १६८० कोटींची जलवाहिनी योजना पूर्ण होण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र पावसाळ्यातही नागरिकांना पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. दरवर्षी पावसाचे पाणी वाहून जाते. त्याचे योग्य नियोजन प्रशासन अजूनही करू शकलेले नाही. मनपाने मोकळ्या जागा, मैदाने, उद्याने, व इतर ठिकाणी जिथे पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्याठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला हवे. यासाठी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना नागरिकांनी निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे, नैसर्गिक साधन संपत्ती विशेषतः स्मार्ट सिटी अंतर्गत उपक्रम संपूर्ण शहरात राभवण्याची ही वेळ आहे. ह्यामुळे नागरिकांना पावसाच्या पाण्याचे महत्व तर राहीलच पण शहरात ज्या ज्या वरील ठिकाणी असे भाग आहेत त्यामुळे तेथील परिसरातील नागरीकांच्या जमिनीत पाण्याची पातळी वाढेल. औरंगाबाद शहरातील ह्या भीषण पाणी टंचाईला आपण निसर्गाची मदत घेऊन मात करू शकू.

एन-३ सिडको येथील शिव छत्रपती महाविद्यालय समोरील मनपाच्या मोकळ्या जागेत पावसाचे पाणी साचते. याठिकाणी मनपाने स्मार्ट सिटी अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग करून येथे साचत असलेल्या पाण्याचा तसेच येथील नागरिकांच्या पाण्याचा ही प्रश्न मार्गी लावून संपूर्ण वॉर्डात तसेच शहरात हा उपक्रम मोठ्या प्रमाणात करावा. यासाठी शहर परिवर्तन आघाडीचे राहुल रामकृष्ण इंगळे, आशिष मार्गे, सत्यप्रकाश राठोड तसेच इतर ह्यांनी मनपा प्रशासक यांना शहरातील जनतेतर्फे निवेदन दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP