परिस्थिती समजून घ्या, शेतकरी आंदोलनामुळे काही गावं कोरोनाची हॉस्पॉट झाली आहेत : खट्टर

manoharlal

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा कहर सुरु असताना देखील गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. याच दरम्यान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आंदोलकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन हरीयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. आंदोलनाच्या ठिकाणी आणि तिथून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होतो आहे. अनेक खेडी आता कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी परिस्थिती समजून घ्यावी, आणि कोरोना चाचणी करण्यासाठी आपणहून पुढे यावं. असं मनोहरलाल खट्टर म्हणाले.

खट्टर म्हणाले,मी शेतकरी नेत्यांना महिन्याभरापूर्वी आवाहन केलं होतं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मागे घ्या. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा आंदोलन करता येईल, असं मी म्हटलं होतं. मात्र आता या आंदोलनामुळे काही गावं कोरोनाची हॉस्पॉट झाली आहेत. येथील काही गावकरी या आंदोलनाच्या ठिकाणी सतत ये-जा करत असल्याने हे घडलं आहे असं खट्टर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP