पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार

टीम महाराष्ट्र देशा- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा एकदा अमेरिकेत जाणार आहेत. येत्या 24 तासांमध्ये पर्रिकर अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती आहे.

मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन पर्रिकर बुधवारी गोव्यात परतणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले होते, मात्र आज ते गोव्यात न परतता पुढील उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार आहेत.

मुख्यमंत्री पर्रीकर 22 जुलैला सायंकाळी अमेरिकेहून अकरा दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी विश्रांती घेतली नाही. दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजपा नेत्यांकडून हाती घेतला व ते लोकांच्या गर्दीत सहभागी होऊन अर्धा किलोमीटर चालत गेले.

दुसऱ्या दिवशी त्यांना कोन्सटीपेशन झाले. तसेच उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मनोहर पर्रिकरांच्या विरुद्ध तरुणींची मोहीम; हो आम्ही बिअर पितो!