गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी बंडखोर वृत्ती स्वीकारली आहे. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. उत्पल पर्रीकर म्हणाले, “माझ्या वडिलांच्या मूल्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे. मला कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, हे भाजपला पटवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे संधीसाधू उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.”
उत्पल पर्रीकर यांनी भाजप सोडण्याची देखील घोषणा केली आहे. उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने उत्पल यांना उमेदवारी नाकारल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आम आदमी पार्टीने उत्पल यांना त्यांच्या पक्षातून तिकीट देण्याची आणि विद्यमान उमेदवार परत घेण्याची ऑफर देखील दिली होती, परंतु उत्पल यांनी कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याशिवाय रिंगणात उतरून आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्पल म्हणाले की, “गेल्या आणि या निवडणुकीत मला पक्षाच्या सर्व सदस्यांचाच नाही तर पणजीतील जनतेचाही पाठिंबा आहे, हे पटवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. असे असूनही मला तिकीट नाकारण्यात आले. गेल्या दोन वर्षांत पक्षात आलेल्या कोणाला तरी तिकीट देण्यात आले आहे. म्हणूनच मला पुढे जायचे आहे आणि माझे राजकीय भवितव्य पणजीतील जनतेला ठरवायचे आहे.”
महत्वाच्या बातम्या:
- नाना पटोलेंनी अपशब्द वापरलेला ‘गावगुंड मोदी’ सापडला, मात्र…
- पद्मश्री कैलाश खेरने आयुष्य संपवण्याचा का घेतला होता निर्णय; जाणून घ्या
- IND vs SA: रन घेताना राहुल आणि पंतनं घातला गोंधळ..! LIVE मॅचमध्ये घडला ‘अजब’ प्रकार; पाहा VIDEO
- गांधीजींची हत्या करणाऱ्याला हिरो बनवले जात असेल, तर त्याचा आम्ही निषेध करु- नाना पटोले
- अजिंठा घाटातील ‘ही’ परिस्थिती पाहून राज्यमंत्री सत्तार चांगलेच संतापले..!