महिलांनी दारू पीणं ही चिंताजनक बाब – मनोहर पर्रिकर

टीम महाराष्ट्र देशा: हल्ली मुलीही खुलेआम मद्यपान करू लागल्याने मला भीती वाटू लागलीय, हे सहनशक्ती संपत चालल्याचं लक्षण आहे. माझं हे विधान अर्थातच सर्वांसाठी लागू आहे, असंही नाही पण महिलांनी दारू पीणं ही देखील नक्कीच चिंताजनक बाब आहे. मी आयआयटीला असताना, आमच्या कॉलेजमधला एक ग्रुप गांजाची नशा करायचा तर काही मुलांना पोर्नोग्राफी पाहण्याचा नाद होता. पण हे सर्व चोरीछुपे चालायचं पण आजकाल हे प्रमाण वाढत चाललंय” अस मत माजी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलंय. ते गोवा सरकारतर्फे आयोजित केलेल्या युवा संसदेत बोलत होते.

मनोहर पर्रिकर हे मोदी सरकार मधील सर्वाधिक लोकप्रिय मंत्री होते तर कधीकाळी गोव्यातलं ड्रग्ज रॅकेट पर्रिकर यांनी मोडीत काढलं होत. गोवा हे देशविदेशातल्या पर्यटकांचं खास आकर्षण असल्याने येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते अशात मनोहर पर्रिकर याचं वक्तव्य महत्वाच मानल जात आहे.

You might also like
Comments
Loading...