मुरली मनोहर जोशी -उद्धव ठाकरे भेट, दोन्ही नेत्यांमध्ये झाली तासभर चर्चा

टीम महाराष्ट्र देशा – भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. जवळपास तासभर मुरली मनोहर जोशी यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. चर्चेचा तपशील गुलदस्त्यात आहे.

भाजपकडून मुंबईमध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजयेयींच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होतेे. या सभेसाठी जोशी मुंबईमध्ये आले होते. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते अडगळीत पडले आहेत. त्यापैकी एक मुरली मनोहर जोशी आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी विरोधात राष्ट्रीय मंच उभारला आहे. मात्र, यात कधीही जोशी यांनी सहभाग घेतला नाही. मात्र अचानक जोशी यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

चार वर्षात विकास कामे का केली नाहीत ? असा सवाल करत भाजप आमदाराला चोप