प्रादेशिक पक्ष सत्तेत येतात मग शिवसेना का नाही; जोशी सरांचा शिवसैनिकांना सवाल

सत्ता हवी असेल तर नेता चांगला लागतो

मुंबई: उत्तम नेतृत्व असूनही सत्तेत का आलो नाही, देशभरात अनेक ठिकाणी प्रादेशिक पक्ष सत्तेत येतात मग शिवसेना का नाही, याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण सापडलं नसल्याच मत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेचा आज ५२ वा वर्धापन दिन असून मुंबईमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ते बोलत होते.

मुंबईप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनी काम करायला हवं, काही गावांमध्ये आजही आपण पोहचलेलो नाही. सत्ता हवी असेल तर नेता चांगला लागतो. शिवसेनेकडे उत्तम नेतृत्व असूनही सत्तेत का आलो नाही याचा विचार होयला हवा असल्याच मनोहर जोशी यावेळी म्हणाले.

दरम्यान, मेळाव्यामध्ये बोलत असतांना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ‘स्वबळावर लढायचे आणि स्वबळावरच एकहाती सत्ता आणायची ती महाराष्ट्रातच, अशी केली आहे. आदित्य यांनी पुन्हा एकदा स्वबळ आजमवण्याचा नारा त्यांनी पुन्हा एकदा दिला. तन आणि मन लावून शिवसैनिक लढत असतात. आपल्याला फक्त मतं नाही तर मनंही जिंकायची आहेत. महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायचीच ही शपथ मी या मंचावरून घेतो आहे असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आदित्यच्या वक्तव्याला संजय राऊतांचं अनुमोदन ; शिवसेना वर्षभरात सत्तेच्या बाहेर ?