उद्धव ठाकरे खरंच मातोश्री सोडणार होते का ? राणेंच्या आत्मचरित्रावर मनोहर जोशी म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : नारायण राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. नौ होल्ड्स बार्ड असं या इंग्रजी आत्मचरित्राचं नाव आहे. हे ९ मे रोजी ते प्रकाशित होणार आहे. दरम्यान राणेंना शिवसेनेत ठेवलंत, तर आपण पत्नीसहीत घर सोडून जाऊ, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती, असा खळबळजनक दावाही त्यांनी आत्मचरित्रात केला आहे. तर मनोहर जोशींना माझ्यामुळे मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हाव लागल होत त्यामुळे त्यांचा माझ्यावर राग असल्याचं नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे. नारायण राणेंच्या आत्मचरित्रावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशा प्रकारच लिहण नारायण राणेंनाचं शोभत मात्र कोणाबद्दल काहीही बोलायचं हा माझा स्वभाव नसल्याने त्यांच्या या आरोपांच उत्तर मी योग्य वेळी देईन अस मनोहर जोशी यांनी सांगितल आहे. तर नारायण राणे हे शत्रू असले तरी मी त्यांचे आत्मचरित्र नक्की वाचेन असे देखील जोशी म्हणाले आहेत.

दरम्यान, ९ मे रोजी नारायण राणे यांचे ‘नौ होल्ड्स बार्ड’ हे आत्मचरित्र प्रकाशित होणार असून यामध्ये अनेक राजकीय गौप्यस्फोट होणार आहेत. त्यामुळे या आत्मचरित्राची सगळ्यांचा उत्कंठा लागली आहे.