‘मनमोहन सिंग हे सर्वोत्तम पंतप्रधान’ शिवसेनेचे सर्टिफिकेट

टीम महाराष्ट्र देशा : मनमोहन सिंग हे नरसिंह राव यांच्यानंतर देशाला लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान होते त्यामुळे त्यांना अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर म्हणणे योग्य ठरणार नाही. असे संजय राऊत यांनी द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटा बाबत आपले मत व्यक्त केले. जर एखादा व्यक्ती पंतप्रधान म्हणून २ वेळा देशाच नेतृत्व करत असेल तर ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहेत असं मला वाटत नाही असे देखील राऊत म्हणाले.

द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हा सिनेमा मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित असून त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार कसा सांभाळला यावर प्रकाश टाकणारा आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. या चित्रपटाचा ट्रेलर राजकीय जगतात खळबळ जनक ठरला असून या सिनेमावर कॉंग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे.

त्याबाबतच आता अनेक राजकीय क्षेत्रातून या चित्रपटा बाबत प्रतिक्रिया समोर येत असतानाच संजय राऊत यांनी सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचं कौतुक केल आहे.

You might also like
Comments
Loading...