देशाच्या बिकट अर्थव्यवस्थेवरून मनमोहन सिंगांनी टोचले पंतप्रधान मोदींचे कान

blank

टीम महाराष्ट्र देशा : देशाच्या अर्थव्यवस्थेत दिवसेंदिवस अडचणी निर्माण होत आहेत. बेरोजगारी, कमी झालेली मागणी, घटलेला उत्पादन दर, घटता देशाचा विकास दर अशा अनेक बाबींमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. यावर देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारचे चांगलेचं कान टोचले आहेत.

एका वृत्तपत्रात मनमोहनसिंग यांनी लेख लिहित देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. विद्यमान सरकारच्या काळात देशातील सामाजिक सौहार्द बिघडल्यामुळं बराच काळ आर्थिक मंदीशी सामना करावा लागत आहे. देशातील नागरिकांचा सरकार आणि देशातील संस्थांवरील विश्वास कमी झाला आहे. आर्थिक मंदीचं हे एक प्रमुख कारण आहे, असे मनमोहनसिंग म्हणाले आहेत.

बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांतील उच्चांकीवर आहे. मागणीत घट झालेली आहे. बँकांची स्थिती वाईट आहे. एकूणच अर्थव्यवस्थेची अवस्था खूपच गंभीर आहे, असं त्यांनी नमूद केलं आहे. मी विरोधी पक्षाचा नेता म्हणून या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान तस पाहता जगात आणि देशात मंदीचे वातावरण आहे. दिवसाअखेर अनेक कंपन्या बंद पडत आहेत. लाखो बेरोजगार नवीन नोकरीच्या शोधात आहेत. तर ज्यांना रोजगार आहे ते ही अर्ध्या पगारात नोकरी करत आहेत. ऑटो क्षेत्र, कापड क्षेत्रातील अनेक कंपन्याना मालकांनी टाळ मारल आहे. तर या क्षेत्राशी निगडीत असलेले अन्य क्षेत्र देखील डबघाईला आले आहे. अशी विदारक परिस्थिती असताना देखील देशाच्या अर्थमंत्री सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर समाधान मानत आहेत.

महत्वाच्या बातम्या