fbpx

कर्जत-जामखेडमधून लढण्यावर मंजुषा गुंड ठाम, रोहित पवारांचं काय होणार ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका झाल्यावर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लाले आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असणार आहे. कारण याठीकाणाहून शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार आपले नशीब आजमावण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांनी देखील या मतदारसंघावर आपला ठाम दावा सांगितल्याने पक्षश्रेष्ठींसमोर मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.

वास्तविक पाहता आघाडीमध्ये हा मतदारसंघ कॉंग्रेसचा आहे. मात्र, रोहित पवार यांची गेल्या दोन वर्षापासूनची तयारी पाहता राष्ट्रवादी हा मतदारसंघ आपल्यकडे खेचण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे. अस असल तरी रोहित पवार यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांनी आव्हान दिल आहे. सध्यातरी राष्ट्रवादीमधून मंजुषा गुंड आणि रोहित पवार हे दोघेच इथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून रोहित पवार व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड हे दोनच उमेदवार इच्छुक आहेत. अशात, मतदारसंघातील विविध प्रश्न व सक्षम विरोधकाचा विचार करता रोहित पवार यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार हेच असतील हे निश्चित झाले आहे. तरी मंजुषा गुंड मात्र या मतदारसंघावरून आपला दावा सोडण्यास तयार नसल्याने येत्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कलहाची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तर रोहित पवार किंवा मंजुषा गुंड यापैकी ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करायचा, असेही यावेळी ठरले. या जागेबाबत राज्य पातळीवरील नेते जो निर्णय घेतील तो मान्य करण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मात्र अस असल तरी मंजुषा गुंड या काय भूमिका घेणार यावर रोहित पवार यांच्या विजयाची गणिते अवलंबून असणार आहे.