आर अश्विनच्या ट्विटला मांजरेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई : काही दिवसापुर्वी संजय मांजरेकरांनी सर्वकालीन क्रिकेटपटुची एक यादी सांगितली. या यादीत डॉन ब्रॅडमन, सोबर्स, गावसकर, तेंडुलकर, विराट या क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला. मात्र त्यावेळी मांजरेकरानी अश्विनचा समावेश सर्वोत्तम क्रिकेटपटुच्या यादीत करण्यास साफपणे नकार दिला. यानंतर आर अश्विनने मांजरेकरच्या ट्विटला उत्तर दिले होते.

आता आर अश्विनच्या या ट्विटला उत्तर संजय मांजरेकरानी उत्तर दिले आहे. उत्तर देताना मांजरेकर म्हणाले की, ‘तुझ्या आत्ताच्या या साधारण क्रिकेटच्या आकड्यांना बघून माझ्या हृदयाला त्रास होतोय..’ असे मजेशिर उत्तर दिले आहे. मांजरेकर यांच्या मते आर अश्विन हा सर्वकालिन महान क्रिकेटपटु नाहीये. कारण त्याने एकदाही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका येथे ५ गडी बाद करण्याची कमाल केली नाही. यावर आर अश्विनने मांजरेकर यांना प्रतिक्रिया देताना अपरिचीत या चित्रपटातील एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर तमीळ भाषेत ‘अपडी सोलधा दा चारी, मानसेल्लम वल्लीकिरधू’ असे लीहीले होते. याचा अर्थ ‘असे बोलु नका वाईट वाटते’ असा होतो. अश्विनच्या या उत्तराचे ट्विट तुफान व्हायरल झाले होते.

आता मांजरेकराच्या या उत्तरावर आर आश्विन काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. आर अश्विन सध्या इंग्लंडमध्ये आहे. अश्विन सध्या विलगीकरणात असुन त्याला आणि भारतीय संघाच्या इतर खेळाडूना सराव करण्याची संधी मिळाली आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघात जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP