मांजरा धरण ‘ओव्हर-फ्लो’; धरणाचे सहा दरवाजे उघडले, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

manjra dam

उस्मानाबाद : जिल्ह्यासह बीड आणि लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा मांजरा प्रकल्प ‘ओव्हर-फ्लो’ झाला आहे. यामुळे या धरणाचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. काल दुपारीच या धरणाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली होती. त्यामुळे आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून धरणाचे सहा दरवाजे २५ इंचने उघडण्यात आले आहेत.

धरणाच्या सहा दरवाजाच्या माध्यमातून १४९.८० क्यूसेस वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान मांजरा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूर येऊ शकतो. त्यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर मांजरा धरण १०० टक्के भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

मांजरा धरण भरल्यामुळे उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील पिण्याचा आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मात्र, परिसरात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले आहे. या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या