fbpx

अय्यरांना ‘नीच’ राजकारण भोवलं ; कॉंग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व रद्द

ayer- vs modi

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना चांगलच भोवलं आहे. कॉंग्रेसने मणिशंकर अय्यर यांचं प्राथमिक सदस्यत्व निलंबित करत, मोदींवर खालच्या भाषेत केलेल्या टीकेबाबत कारणे दाखवा नोटीसही अय्यर यांना बजावली आहे. मणिशकंर अय्यर यांनी मोदींना उद्देशून ‘नीच प्रवृत्तीचा माणूस’ असे शब्द वापरले होते.

मणिशंकर अय्यर यांच्या या वक्तव्याचा कॉंग्रेसचे भावी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा समाचार घेत अय्यरांना माफी मागण्यास सांगितले होते.