कॉंग्रेसला मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा,आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

गोविंददास

नवी दिल्ली- मणिपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथौजम यांनी आपल्या पदाचा मंगळवारी राजीनामा दिला. यानंतर 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करायची तयारी पूर्ण केल्याचं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येऊ लागलं. या सगळ्या आमदारांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं कळतंय.

गोविंददास यांनी काँग्रेस सोडणं हे काँग्रेस नेत्यांसाठी आश्चर्याचा धक्का मानला जात आहे. गोविंददास हे 6 वेळा विधानसभा निवडणूक जिंकले असून त्यांनी विरोधीपक्ष नेत्याची भूमिकाही बजावली आहे. डिसेंबर 2020 मध्ये त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. सध्या मणिपूरमध्ये भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता असून आगामी निवडणुकीतही भाजपलाच विजय मिळावा यासाठीची ही व्यूहरचना असल्याचे सांगितले जात आहे.

मणिपूरमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. तिथे 2017 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकीत काँग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या. एनपीएफ आणि एनपीपी या पक्षांना प्रत्येकी 4 जागा मिळाल्या होत्या. तृणमूल काँग्रेसचा इथे 1 आमदार निवडून आला होता तर 3 आमदार अपक्ष म्हणून निवडून आले होते. सध्या या विधानसभेत 4 जागा रिक्त असल्याने एकूण संख्याबळ हे 56 इतके झाले आहे. भाजपने एनपीएफ,एनपीपी आणि अपक्षांची मदत घेत मणिपूरमध्ये सरकार स्थापन केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

IMP