माणिकरावांचे बंड झाले थंड, नाराज असलो तरी पक्ष सोडणार नाही

blank

टीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी कडून नंदुरबार लोकसभा मतदार संघातून माणिकराव गावित यांच्या मुलाला उमेदवारी न दिल्याने नाराज माणिकरावांनी पक्ष त्यागाची भूमिका घेतली होती. मात्र आता माणिकराव यांनी नाराज असलो तरी पक्ष सोडणार नाही अस म्हणत पलटी मारली आहे.

यंदा नंदुरबार लोकसभा मतदार संघातून आघाडीने माणिकराव यांच्या पुत्राला डावलत के. सी. पाडावी यांना उमेदवारी जाहीर आली आहे.त्यामुळे नाराज माणिकराव गावित यांनी पक्ष त्यागाची भूमिका घेतली होती. तसेच माणिकराव हे कॉंग्रेस चे जेष्ठ नेते असून देखील मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना भेटीसाठी वेळ दिली नाही. त्यामुळे माणिकराव यांच्या नाराजीत आणखीनच भर पडली आहे. एवढ होऊन देखील माणिकराव यांनी कॉंग्रेस मध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले तसेच त्यांनी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील भूषवलं. इतकी वर्ष काम करुनही कॉंग्रेस ने भरत याचं तिकीट कापलं आहे. विशेष म्हणजे भरत गावित यांना उमेदवारी मिळावी अशी मतदार संघातील अनेक तरुणांची इच्छा आहे.