fbpx

कॉंग्रेसला मोठा झटका, माणिकराव बंडाच्या तयारीत

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी सोयीनुसार पक्षांतर केले आहे. तर आता राज्यातील कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचा इशारा दिला आहे. या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघातून आपल्या मुलाला उमेदवारी न दिल्याने नाराज माणिकराव गावित हे कॉंग्रेसचा हात सोडणार आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला आहे.

यावेळी गावित म्हणाले की, भरत गावित चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले तसेच त्यांनी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील भूषवलं. इतकी वर्ष काम करुनही कॉंग्रेस ने भरत याचं तिकीट कापलं आहे. विशेष म्हणजे भरत गावित यांना उमेदवारी मिळावी अशी मतदार संघातील अनेक तरुणांची इच्छा आहे.पुढे गावित म्हणाले की, 30 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात अपक्ष उभं राहायचं की भाजपला पाठिंबा द्यायचा, यावर निर्णय घेणार आहे.

दरम्यान नंदुरबार मतदार संघातून भाजपने विद्यमान खासदार हीना गावित यांना पुन्हा रिंगणात उतरवल आहे, तर काँग्रेस आघाडी कडून त्यांच्याविरोधात के. सी. पाडवी यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे मुलाला तिकीट न मिळाल्याने माणिकराव बंडाच्या तयारीत आहेत. माणिकराव यांनी कॉंग्रेस विरुद्ध बंड पुकारले तर याचा फटका कॉंग्रेसला नंदुरबार मध्ये जोरदार बसण्याची शक्यता आहे.

2 Comments

Click here to post a comment