‘१० हजार खोल्या होत्या,श्रीराम कुठल्या खोलीत जन्माला आले कुणाला माहीत?’

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेले कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे आता राममंदिराबाबत उधळलेल्या मुक्ताफळांमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. ‘राजा दशरथाच्या महालात १० हजार खोल्या होत्या त्यामुळे श्रीराम कुठल्या खोलीत जन्माला आले कुणाला माहीत? त्यामुळे तुम्ही कोणत्या आधारावर मंदिर बनवण्याच्या गोष्टी करता’ अशी गरळ अय्यर यांनी ओकली आहे.दिल्लीत ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’द्वारा आयोजित ‘एक शाम बाबरी मस्जिद के नाम’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

६ डिसेंबरचा दिवस भारत देशासाठी पतनाचा दिवस होता. ६ डिसेंबर १९९२ मध्ये जे काही झाले ते व्हायला नको होते, असंही त्यांनी म्हटलंय. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्याकडून मोठी चूक झाल्याचंही ते आपल्या वकव्यात म्हणालेत. बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्याची घटना म्हणजे संविधानाची हत्या असल्याचंही मणिशंकर अय्यर यांनी म्हटलंय. अय्यर यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना आणि कॉंग्रेसला समाज माध्यमांवर अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे .

Loading...