मणिशंकर अय्यर यांच्या विरोधात संगमनेरमध्ये फौजदारी गुन्हा दाखल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्दाचा वापर करणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या विरोधात संगमनेर (जि. नगर) येथील पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्ते राजेंद्र देशमुख यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला. अय्यर यांनी केलेल्या वक्तव्याने देशभरातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असेही देशमुख म्हणाले. दरम्यान अय्यर यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली. मात्र पक्षाने अय्यर यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित केल्याचे समजते.

You might also like
Comments
Loading...