‘मोदी हा अतिशय नीच प्रकारचा माणूस’-मणिशंकर अय्यर

ayer- vs modi

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे जेष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी अत्यंत खालची पातळी गाठल्याच चित्र आज सगळ्या देशाने पाहिलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय नीच व्यक्ती असल्याचे अय्यर यांनी म्हटले. मोदींकडे किमान सौजन्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना मोदींनी नीच राजकारण केले. या राजकारणाची काय गरज होती?,’ असा प्रश्नही अय्यर यांनी विचारला.
एका कार्यक्रमात बोलताना ‘राष्ट्र उभारणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. हे योगदान दुर्लक्षित करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, तरीही ज्या कुटुंबाने असे प्रयत्न केले त्यांच्यापेक्षा आंबेडकरांचाच लोकांवर जास्त प्रभाव राहिला,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते.
मोदींच्या या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी अत्यंत खालची पातळी गाठली . त्यांनी मोदींवर टीका करताना त्यांचा उल्लेख नीच व्यक्ती असा केला. ‘हा अतिशय नीच प्रकारचा माणूस आहे. या माणसाकडे जराही सौजन्य नाही. अशा प्रसंगी त्यांना घाणेरडे राजकारण करण्याची काय आवश्यकता होती?,’ असे अय्यर यांनी म्हटले आहे . देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलताना नीच या शब्दाचा वापर केल्यामुळे अय्यर यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागली आहे .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका