मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची माळ मंगलप्रभात लोढांच्या गळ्यात

blank

टीम महाराष्ट्र देशा : भाजपमध्ये नेतृत्वबदलाचे वारे वाहत असून आता आशिष शेलार यांच्या जागी मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाचा कारभार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आशिष शेलार यांच्याकडे शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळे त्यांच्या जागी लोढा यांना मुंबई भाजपची जबाबदारी देण्यात आली आहे.

blank

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. स्वच्छ प्रतिमा आणि संघटनेत केलेलं काम यामुळेच त्यांची निवड करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. राज्यात आता काही काळातच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त न ठेवता लगेच भाजपने ही निवड जाहीर केली आहे.