केरळमधील हत्तीणीच्या प्रकरणावरून मेनका गांधींची राहुल गांधींवर खोचक टीका

rahul gandhi

तिरुवनंतपुरम : केरळमधील एक अमानुष घटना उघडकीस आली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना काळजाचा थरकाप उडविणारी आहे. केरळमधील मलप्पुरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्या मुलासह तिचा मृत्यू झाला.

पलक्कड जिल्ह्यातल्या मन्नारकड भागाचे वनाधिकारी सुनीलकुमार यांनी बीबीसीला सांगितलं, ’25मेला ही हत्तीण वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडली, ती रस्ता चुकून जवळच्या शेतांमध्ये गेली होती. कदाचित तिच्या पोटातल्या पिलासाठी तिला काही खायचं असावं’.

हे प्रकरण मलप्पुरम जिल्ह्यातील आहे. अन्नाच्या शोधात ही गर्भवती भुकेलेली हत्तीण जंगलातून बाहेर आली. ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. काही स्थानिक लोकांनी तिला अननसाद्वारे फटाके खायला घातले. भुकेने त्रस्त झालेल्या या हत्तीणीने ते अननस खाल्ले आणि थोड्याच वेळात तिच्या पोटात फटाके फुटले. वेदनांनी ग्रासलेल्या या हत्तीणीला काहीच कळलं नाही, तेव्हा ती वेलीयार नदीत उभी राहिली. वेदना कमी करण्यासाठी संपूर्ण वेळ फक्त पाणीच पित होती.

हत्तीणीला एवढ्या वेदना होत होत्या की ती तीन दिवस फक्त नदीत उभी होती. मात्र नदीतच तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तीणीचं वय ते 14-15 वर्ष होत. हत्तीणीला योग्य वेळेत मदत मिळाली असती तरी तिचे प्राण वाचले असते. हत्तीणीची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी त्याचा बचाव करण्यासाठी दाखल झाले. पण ती पाण्याबाहेर न पडल्याने शनिवारी तिचा मृत्यू झाला.या घटनेचे तीव्र पडसाद सोशल मिडीयावर पडताना पहायाला मिळत आहेत.

दरम्यान, या संवेदनशील मुद्द्यावरून देखील राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी आता भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मेनका गांधींनी केरळमधील वायनाडमधून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना निशाण्यावर घेतले.

वृ्त्तसंस्था एएनआयशी पुढे बोलताना, ‘कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्याच भागातील आहेत, त्यांनी अद्याप कारवाई का केली नाही?’ असा प्रश्नही मेनका गांधी यांनी विचारला.

“वन विभागाच्या सचिवांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण खात्याच्या मंत्र्यांना थोडीजरी समज असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा”, असे मेनका गांधी म्हणाल्या.

कर्जबुडव्या विजय मल्ल्या भारतात येताच त्याला सीबीआय रिमांडमध्ये घेणार ?

पहा, रिंकूला कशाची चिंता सतावतेय

मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत राहुल गांधीही करणार ‘मन की बात’