नरभक्षक वाघिणीला ठार केल्यामुळे मनेका गांधी संतापल्या

मुंबई : चंद्रपुरातील ‘अवनी’ वाघिणीला ठार केल्यानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे,’ असंही मनेका गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

Loading...

‘वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी झाली आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत 3 वाघ, 10 बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास 300 रानडुकरांची हत्या केली आहे. अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता,’ असा सवाल राज्य सरकारला विचारत मनेका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.

 

आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

‘वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं असे करायला हवे’ अशी टीका टी-1 वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवरून वन मंत्रालयावर केली आहे.वाघिणीला मारण्याची न्यायालयाकडून परवानगी होती का? तिला बेशुद्ध करून पकडता आलं नसतं का? एक वन्यजीवप्रेमी म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र आज अवनीला ठार केलं. उद्या तिच्या बछड्यांचा किंवा आणखी दुसऱ्या वाघाचा बळी घेतला जाईल, असा असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?
13 जणांचा जीव घेणाऱ्या टी-1 वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या 47 दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं तिला ठार केलं. वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली.Loading…


Loading…

Loading...