संतापजनक : बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भाजप आमदारने मानायला लावले खासदाराचे आभार

मंदसौर : मंदसौर येथे मंगळवारी घरी जाण्यासाठी शाळेच्या बाहेर पालकांची वाट पाहत उभ्या असलेल्या एका चिमुकलीचे अपहरण करून तिचा बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याचीही पीडितेच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे. तर दुसरीकडे पीडित कुटूंबाची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या आमदाराने तुम्ही खासदार साहेबांचे आभार माना असा सल्ला दिल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येतं आहे.

शुक्रवारी मंदसोरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर अत्यंत घृणास्पदरीत्या बलात्कार झाला. त्या प्रकाराचा रस्त्यावर उतरून जनतेनं निषेध नोंदवला. त्याच दरम्यान भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांच्याबरोबर आमदार सुदर्शन गुप्ताही पीडित चिमुकलीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी इंदुरच्या एमवाय रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात पीडितेचं कुटुंबही उपस्थित होतं. खासदारांनी डॉक्टरांकडे मुलीच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्याच वेळी आमदार सुदर्शन पीडितेच्या कुटुंबीयांना म्हणाले, खासदारसाहेबांना धन्यवाद बोला.

एकीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहानांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. बलात्कारी हे भुईला भार असून त्यांना जिवंत राहण्याचा अधिकारच नसल्याचंही ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते खालच्या पातळीवरचं राजकारण करत असल्याने टीकेचे लक्ष्य बनत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण

bagdure

मंदसौर येथे मंगळवारी घरी जाण्यासाठी शाळेच्या बाहेर पालकांची वाट पाहत उभ्या असलेल्या या चिमुकलीचे इरफान उर्फ भैय्यू (20) याने अपहरण करून तो तिला बस स्थानकाजवळील झुडपांच्या मागे घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. स्थानिक बाजारपेठेत मजूर म्हणून काम करत असलेल्या इरफानला पोलिसांनी अटक केली आहे.

सबंधित बातम्या 

मंदसौर बलात्कार : बलात्कार करणाऱ्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही
संतापजनक : मध्यप्रदेशमध्ये चिमुकलीवर पाशवी अत्याचार ; कोपर्डी घटनेची पुनरावृत्ती
You might also like
Comments
Loading...