अभिनेत्री शर्मिष्ठाच्या ‘त्या’ आरोपांवर मंदारचा भावनिक खुलासा

mandar devsthali

मुंबई : आभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने कलर्स मराठीवर या चॅनेलवर प्रसारित होत असलेल्या ‘हे मन बावरे’ या मालिकेतील कलाकारांचे निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. मृणाल दुसानिस, शशांक केतकर, संग्राम समेळ या कलाकारांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत याबाबत मत व्यक्त केलं आहे. शर्मिष्ठाने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित कामाचे पैसे अजूनही मिळाले नसल्याची तक्रार केली.

इस्टाग्रामवर पोस्ट करताना अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर मालिकेचे पैसे थकविल्याचा आरोप केला होता. त्यानंतर निर्माते दिग्दर्शक मंदार देवस्थळीं यांनीही आपली बाजू मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांची बाजू मांडली. या पोस्टमध्ये आर्थिक परिस्थिती बिकट आहे, मी खरंच वाईट माणूस नाही, अशा शब्दांत त्यांनी जाहीर माफीदेखील मागितली. त्यांच्या या पोस्टनंतर या प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकर यांनी मध्यस्थी करायचा निर्णय घेतला आहे.

अमेय खोपकर यांनी आपल्या पोस्टमध्ये मध्यस्ती करताना म्हटले आहे की, ‘कोरोना काळात मनोरंजन विश्वाला जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्याचं गांभीर्य आता सर्वांच्या लक्षात येत आहे. सोशल मीडियावरुन त्याची जाहीर चर्चा काही निष्पन्न होणे शक्य नाही. मंदार देवस्थळीसारख्या एकट्या-दुकट्या निर्मात्याला लक्ष्य करुन काही साध्य होणार नाही. इतरही बरेच टिव्ही निर्माते आर्थिक अडचणीत आहेत आणि त्याचा फटका कलाकार-तंत्रज्ञ सर्वांनाच बसतोय. कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे दूर झालेलं नाही. अशा या काळात सामंजस्याने वागून मध्यम मार्ग कसा काढता येईल या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. कोरोनामुळे आपली एकी भंग व्हायला नको. एकत्र येऊया आणि या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करुया,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

महत्वाच्या बातम्या