जगण्यापेक्षा फाशी घेण्याची परवानगी दया मांडकी ग्रामस्थांची मागणी

कचरा डेपो विरोधात संतप्‍त ग्रामस्थांचे आंदोलन

औरंगाबाद :औरंगाबाद येथून नारेगाव मांडकी येथे कचरा घेवून जाणार्‍या सगळया महापालिकेच्या गाडया मांडकीच्या ग्रामस्थांनी अडविल्या. मांडकी येथील कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले असून, औरंगाबादचा सगळा कचरा येथे टाकला जातो या कचरा डेपोमुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. असे जगण्यापेक्षा फाशी घेण्याची परवानगी दया अशी मागणीही गावकर्‍यांनी केली.
महापालिका शहरात निघणारा सुमारे साडेचारशे टन कचरा दररोज या ठिकाणी टाकते. मात्र, त्यावर कुठलीही प्रक्रिया करण्यात येत नसल्याने 43 एकर जागेवर कचर्‍याचे डोंगर निर्माण होवुन प्रदूषण वाढले आहे. हा प्रश्न मिटला नाही तर कचरा आयुक्तांच्या बंगल्यावर, महापौरांच्या घरी टाकू असा इशारा आज त्यांनी महापालिका प्रशासनास दिला.

You might also like
Comments
Loading...