fbpx

निष्पापांचे जीव घेणारे मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी अतिरेकीचं : मनसे

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. गोरेगाव येथील उघड्या गटारात पडून एक लहान मुलगा वाहून गेला आहे. यावरून मनसेने सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

मनसेचे सरचिटणीस आणि संदीप देशपांडे यांनी “ज्या पद्धतीने निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना आपण देशद्रोही म्हणतो. त्याच पद्धतीने ज्यांच्या गलथान कारभारामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत तेही अतिरेकी आहेत, देशद्रोही आहेत. जो पक्ष महापालिकेत सत्तेत आहे, त्यांच्या गलथान कारभारामुळेच निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, अतिरेकी आहेत.”अस वक्तव्य केले आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी “जर एखादं हॉस्पिटल बांधलं, तर त्याचं श्रेय शिवसेना घेते. मग आता या जीवघेण्या गलथान कारभाराचीही जबाबदारी शिवसेनेची आहे.”अस विधान केले आहे.