मानल गड्या तुला! कोरोनामुक्त होताच आशय कुलकर्णी चित्रीकरणासाठी सज्ज

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमिवर राज्य आणि देशात अनेक शहरात लॉकडाउन लागु करण्यात आले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती.

झी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतील मुख्य भूमिकेतील अभिनेता आशय कुलकर्णीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र कोरोना मुक्त होताच तो चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. या दरम्यान महाराष्ट्रात लॉकडाउनमुळे या मालिकेचे चित्रीकरण हे गोव्यात सुरु होते. आशय कुलकर्णीही या मालिकेच्या सेटवर दाखल झाला आहे. आशय भूमिका करत असलेले अनिकेत पात्र मालिकेत परत येतोय. यानंतर आता मालिकेत बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत.

मालिकेत नुकतेच अनिकेत मानसी त्यांचं लग्न झालंय हे दोघे घरी सांगणार आहेत. अनिकेतच्या येण्याने मानसी मनातून खंबीर झाल्याने विक्षिप्त समरला त्याचाच भाषेत उत्तर द्यायला अनिकेत मानसी सज्ज झालेत. त्यामुळे आता समर आणि अनिकेत ची टक्कर होणार हे निश्चित झालंय. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

महत्वाच्या बातम्या