मंत्रालयानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या घरापुढे एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर: मंत्रालयात सुरु असलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी एका बाजूला महाराष्ट्र हादरून गेला आहे, तर दुसरीकडे नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय घरासमोर एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. संबंधित व्यक्ती ही सरकारी कर्मचारी कर्मचारी असून त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘रामगिरी’ बंगल्यासमोर हा सर्व प्रकार घडला आहे. संबंधित व्यक्ती ही नागपूर महापालिकेत कार्यरत होती. मात्र त्यांना अनुशासनात्मक कारवाई करुन नोकरीवरुन काढून टाकण्यात आल असल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच अशा प्रकारे कारवाई करण्यात आलेल्या सात जणांनी पत्रकार परिषद घेत कामावर न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.Loading…


Loading…

Loading...