कॉंग्रेसला मतदान का केलं म्हणत भाजप समर्थकाने झाडल्या भावावरचं गोळ्या

टीम महाराष्ट्र देशा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांमध्येच नाही तर भावंडांमध्येही मतभेद पहायला मिळाली. भाजपला मतदान न करता कॉंग्रेसला मतदान का केले म्हणत स्वतःच्या भावावरच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हरियानातील झज्जर येथील ही घटना आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरु आहे. येत्या १९ मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर १२ मे रोजी काँग्रेस समर्थक आणि भाजपा समर्थकांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी, भाजपा समर्थक धर्मेंद्रने त्याचा भाऊ राजा याने लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान केले होते. त्यावेळी आपल्या भावानेही भाजपाला मतदान करावं अशी इच्छा धर्मेंद्रची होती. मात्र राजाने कॉंग्रेसला मतदान केले. त्यावेळी भावाने कॉंग्रेसला मतदान केल्याचा राग मनात धरत त्याने स्वत:च्या भावावर गोळीबार केला. इतकेच नव्हे तर, या घटनेदरम्यान मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या आईला जबर दुखापत झाली. त्यामुळे आई आणि मुलावर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विशेष म्हणजे, धर्मेंद्र याच्यावर बेकायदेशीररित्या हत्यार ठेवून गोळीबारी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.