एअरटेलकडून ग्राहकाला १ लाख ८६ हजार ५५३ रुपयांचे बील !

airtel

नवी दिल्ली : एअरटेल कंपनीने दिल्लीतील नितीन सेठी या ग्राहकाला १ लाख ८६ हजार ५५३ रुपयांचे बिल पाठवून ते तातडीने भरायला सांगितल्याची घटना घडली आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार नितीन सेठी यांचे हे बिल ८ जुन ते ७ जुलै दरम्यान आले आहे. नितीन यांच्या बिलावर क्रेडिट लिमिट १४ हजार रुपयांपर्यंत असूनही कंपनीने त्यांना १लाख ८६ हजार रुपयांचे बिल पाठविले आहे. या प्रकारानंतर नितीन यांनी कंपनीकडे तक्रार केल्यानंतर तांत्रिक कारणामुळे एवढी रक्कम पाठविण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.