पुणे : पॅन्ट फाटल्यामुळे थेट पोलिसात तक्रार

pmpml

पुणे – पीएमपीएमएलच्या (पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या) बसमधून प्रवास करताना एका प्रवाशाची पॅन्ट फाटल्यामुळे संतापलेल्या या प्रवाशाने पीएमपीएमएलविरोधात थेट पोलिसांकडे तक्रार केल्याची घटना आज घडली आहे . झालेली नुकसान भरपाई पीएमपीएमएलने भरून देण्याची मागणी केली आहे. शिवाजीनगरहून जांभूळवाडीला जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसमध्ये हा प्रकार घडला.

Loading...

काय आहे नक्की प्रकार ?

आज सकाळच्या सुमारास कात्रजला जाण्यासाठी बिबवेवाडी बस स्टॉपवर संजय शितोळे हे पीएमपीएमएलच्या शिवाजीनगर- जांभूळवाडी बसमध्ये चढले. ते ज्या आसनावर जाऊन बसले. आपल्या गंतव्यस्थानी पोहचले असता ते जागेवरून उठले असता त्यांची पॅन्ट आसनाच्या इथे बाहेर आलेल्या धातूच्या पट्टीला लागून फाटली. त्यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार बस कंडक्टरकडे केली. मात्र कंडक्टरने यामध्ये आपली काहीच चूक नसल्याचे सांगत संजय यांना संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्यास सांगितले. मात्र कंडक्टर आणि संजय यांच्यातील बाचाबाची वाढल्यानंतर बस थेट कात्रज पोलीस चौकीमध्ये नेण्यात आली. तेथे दोन्ही बाजूचे म्हणणे पोलिसांनी ऐकून घेतले. अखेर संजय यांनी पीएमपीएमएल प्रशासनाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीएमपीएमएलने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संजय यांनी केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतरच बस जांभूळवाडीकडे रवाना झाली. आता या प्रकरणात पीएमपीएमएल काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...