जेव्हां माणूस कुत्र्याला चावतो…

टीम महाराष्ट्र देशा : पत्रकारितेच शिक्षण घेत असतांना बातमीदारी विषयात बातमी म्हणजे काय किंवा बातमी कशाची होते हे शिकवतात. याच मुख्य उदाहरण कानावर यायचं ते ‘कुत्रा माणसाला चावला ती बातमी नाही मात्र जर का माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी’ हे शिक्षक नेहमी सांगत असतात. आज हे उदाहरण खर उतरलं ते असं. अमेरिकेत एक माणूस चक्क कुत्र्याला चावला. त्यामुळे पोलिसांनी कुत्र्याला चावल्याप्रकरणी सदर माणसाला अटक केली.

कुत्र्याचा माणसाणे चावा घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत लेप्टनंट किलरी म्हणाले की,‘तुम्ही पोलिसांच्या कुत्र्याबरोबर चावण्याची स्पर्धा करत असाल तर तुम्ही जिंकणार नाही. कारण त्याला चांगले माहिती आहे कसे चावायचे.’ अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील एका व्यक्तीने अटक टाळण्यासाठी पोलिसांच्याच कुत्र्याला कपड्यांमध्ये गुंडाळून लपवण्याचा प्रयत्न केला. तसेच कुत्र्याच्या डोक्याचा चावा घेत पट्ट्याच्या सहाय्याने गळा आवळला. याबाबत स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानूसार,‘अटक टाळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि कुत्र्याचा चावा घेतल्याबद्दल एकाला अटक केली आहे. पोलिस तपासासाठी संबंधित व्यक्तीच्या घरी गेले असताना ही घटना घडली.’

You might also like
Comments
Loading...