सार्वजनिक शौचालयामध्ये तरुणीचे चित्रीकरण करणारा अटकेत

मुंबई : सार्वजनिक शौचालयामध्ये चोरुन तरुणींचे चित्रीकरण करणा-या इसमाला वाकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इंद्रजीत लाखन असे या तरुणाचे नाव आहे. वाकोला येथील धोबीघाट परिसरात इंद्रजीत लाखन हा राहत असून अनेक दिवसांपासून याच परिसरातील एका तरुणीच्या तो मागावर होता. मात्र ही तरुणी इंद्रजीतकडे दुर्लक्ष करत होती. त्यामुळे तिला धडा शिकविण्याच्या हेतूने इंद्रजीतने ती सकाळी सार्वजनिक शौचालयात गेली असता तिच्या मागे जाऊन तिचे चित्रीकरण केले.

भितीवरून अंगावर काहीतरी पडले त्यावेळी हा प्रकार तरुणीच्या लक्षात आला. तिने आरडाओरड केली त्यावेळी येथील लोकांनी इंद्रजीतला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मोबाईल तपासणीसाठी फॉरेंसिक लॅबला पाठविण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...