ममतांनी भाजपच्या जखमेवर चोळले मीठ; शेवटाची सुरुवात झाली

नवी दिल्ली: सर्व देशाचे लक्ष असणाऱ्या उत्तर प्रदेश पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. विजयाची घोडदौड सुरु ठेवणाऱ्या भाजपसाठी हि निवडणूक प्रतिष्ठेची आहे. एकाही जागेवर पराभव झाल्यास भाजपासाठी हा मोठा धक्का समजल्या जाणार असून योगींचा बालेकिल्ला ढासळणार असल्याचे चित्र दिसत आहेत. त्यावर प. बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत चिमटा काढला आहे.

उत्तर प्रदेशात सप-बसप एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच मतदार संघात भाजप उमेदवाराचा पराभव होणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपवर कठीण प्रसंग ओढावला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी कोणतीही संधी न दवडता भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारे ट्विट त्यांचे नाव घेता केले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, हा मोठा विजय आहे. शेवटाची सुरुवात करून दिल्याबद्दल मायावतीजी आणि अखिलेश यादवजी यांचे अभिनंदन. ‘ गोरखपूर मी रहना होगा तो योगी योगी कहना होगा’याच मतदारसंघात भाजपची ही घोषणा फोल ठरली आहे. कारण समाजवादी पक्षाने निसटती आघाडी घेतली आहे. तर फुलपूर मतदारसंघातही सपाने तब्बल १२००० मतांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकांसाठी एकत्र येण्याचा सपा आणि बसपाचा निर्णय योग्य असल्याचे दिसून येत आहे.

You might also like
Comments
Loading...