अंमली पदार्थप्रकरणी ममता कुलकर्णी अजूनही फरारच

Mamata Kulkarni

चिंचोळी एमअायडीसी भागातील एव्हाॅन इफेड्रीन कंपनीतील अंमली पदार्थ प्रकरणात सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णी व विकी गोस्वामी यांच्यावरही गुन्हा दाखल अाहे. गोस्वामीला काही दिवसांपर्वी अमेरिकन पोलिसांनी ताब्यात घेतले अाहे. ममता कुलकर्णी मात्र अजूनही बेपत्ताच अाहे. दरम्यान, सोलापूर कंपनीतील कामगारांनी अामचे थकलेले पगार कंपनी सुरू करण्यासाठी कामगार न्यायालयात दावा दाखल केला अाहे. अाता पुढील तारीख सप्टेंबरमध्ये होणार अाहे. सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी तपास अधिकारी तथा ठाण्याचे सहायक पोलिस अायुक्त भरत शेळके हे अाज सोलापुरात अाले होते. एव्हाॅन कंपनीतील जप्त करण्यात अालेला अमली पदार्थ साठा नष्ट करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली अाहे. लवकरच ते पदार्थ नष्ट करण्यासाठी एक पथक येणार असल्याची माहिती श्री. शेळके यांनी दिली. विकी गोस्वामी सध्या अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात असून, ममता कुलकर्णी फरार असल्याचे ते म्हणाले.Loading…
Loading...