आमचं पहिलं कर्तव्य जातीसाठी, मग समाजासाठी…कॉंग्रेसच्या महिला मंत्र्याचे जातीयवादी वक्तव्य

congress-flag

अल्वर : आमचं पहिलं कर्तव्य जातीसाठी, मग समाजासाठी, त्यानंतर सर्वांसाठी…हे वक्तव्य आहे राजस्थानच्या महिला व बालविकास मंत्री ममता भूपेश यांचे. ममता भूपेश यांनी केलेल्या जातीयवादी विधानामुळे कॉंग्रेसवर चौफेर टीका होऊ लागली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘जाती’ प्रेमाचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजस्थानमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे.

सोमवारी रैणीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ममता भूपेश यांनी हे वक्तव्य केले. ममता भूपेश यांनी केलेल्या विधानामुळे कॉंग्रेसचा सेक्युलर आणि पुरोगामीपणाचा बुरखा फाटला असल्याची टीका आता विरोधक करू लागले आहे.