fbpx

३६ तासात माफी मागा, ममता बॅनर्जींच्या भाच्याने मोदींना पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील मतदान सध्या पार पडत आहे, प्रचारातील आरोपप्रत्यारोपांनंतर आता सर्व देशाचे लक्ष निकालांकडे असणार आहे, मतदानापूर्वी भाजप आणि तृणमूलचा टोकाचा संघर्ष पहायला मिळाला आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा व खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे

मोदी – शहा आणि ममता बॅनर्जींचमध्ये निर्माण झालेल्या टोकाच्या संघर्षामध्ये बंगालमधील सभेत मोदी यांनी जोरदार टीका केली होती. ममता आणि त्यांच्या भाच्याने बंगालला बदनाम केले आहे. राज्यात लुटालूट आणि हिंसा पसरवण्यात या दोघांनी कुठलीच कसर ठेवली नाही, अशी टीका मोदींनी केली होती.

दरम्यान, खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकत मोदींना कोणत्याही अटीशिवाय माफी मागण्यासाठी 36 तासांचा कालावधी दिला आहे. माफी न मागितल्यास मोदींना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अखेरच्या टप्यातील मतदान आज

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यांतील ५९ जागांसाठी हे मतदान होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लढत असलेल्या वाराणसी लोकसभेचा देखील समावेश आहे. अखेरच्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात ९१८ उमेदवार आहेत. १० कोटींहून अधिक मतदार त्यांचे भवितव्य ठरवणार आहेत. तर २३ मे रोजी दिल्लीच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.