तृमणूल काँग्रेसला खिंडार,भाजपने वाढवली ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणूक जवळ येवू लागली असून फोडाफोडीचे राजकारण आता सुरु झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृमणूल काँग्रेसला नामोहरम करण्याचा चंग बांधलेल्या भाजपने चांगलाच धोबीपछाड दिला आहे.

तृणमूलचे खासदार सौमित्र खान व अनुप हजारा यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अर्पिता रॉय आणि शताब्दी घोष हे दोन खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं असून त्यामुळं ममतांची चिंता वाढली आहे.

दरम्यान,याआधी तृणमूलचे क्रमांक दोनचे नेते मुकुल रॉय यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने तृणमूलची डोकेदुखी वाढली होती. आता तृणमूलचे आणखी सहा खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

You might also like
Comments
Loading...