ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीला राष्ट्रवादीच्या कार्यालयात

mamata with sharad pawar1

नवी दिल्ली: आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मात देण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. विरोधकांच्या बैठकीवर बैठकी सुरु असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर ममतांची आजची दिल्ली भेट राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. भेटीवेळी शरद पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, धनंजय महाडिक आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. ममतांनी दिल्लीत अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या त्यामध्ये, संजय राऊत, राजू शेट्टी यांचा सहभाग आहे. दिल्लीत वाढत्या भेटीगाठीवरुन भाजपविरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.

लोकसभा निवडणुकीला १४ महिने बाकी असतांना राजकीय पक्षांनी भाजपला मात देण्यासाठी कंबर कसली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती.

Loading...