ममता बॅनर्जी यांचा विजय हा नव्या पक्षांना तसेच प्रादेशिक पक्षांना नवी आशा देणारा आहे – आप

ममता

पुणे – चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगालमधे तृणमूल काँग्रेस,तामिळनाडूत द्रमुक, केरळमधे डावी लोकशाही आघाडी, पुदुच्चेरीमधे राष्ट्रीय लोकशाही आघाडी, तर आसाममधे भाजपानं बाजी मारली आहे. आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळमधे सत्ताधारी पक्षांनी सत्ता कायम टिकवली आहे. तर तामीळनाडू आणि पुदुच्चेरीमधे सत्ता परिवर्तन होत असल्याचे संकेत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा सत्ता राखली आहे. भाजपानं देखील बंगालमध्ये मोठी मुसंडी मारली आणि दुसरा क्रमांक पटकावला. डावी आघाडी, काँग्रेस आणि नवनिर्मित इंडियन सेक्युलर फ्रंट यांना फारसं यश मिळालं नाही. स्वातंत्र्यानंतर प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पश्चिम बंगालमध्ये एकही जागा मिळाली नाही.

दरम्यान, या निकालावर आम आदमी पक्षाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत ‘आप’चे नेते मुकुंद किर्दत म्हणाले, दिल्लीनंतर प बंगाल च्या निकालांनी भाजपच्या राजकीय सपाटीकरणाच्या मर्यादा उघड झाल्या आहेत ! यामधे भाजप चा पाया काही प्रमाणात मजबूत होताना दिसतो आहे पण त्याला मर्यादा आहेत हेच दिसते आहे.

ममता बॅनर्जी यांचा विजय हा नव्या पक्षांना तसेच प्रादेशिक पक्षांना नवी आशा देणारा आहे. ममता बॅनर्जी यांचा चिवटपणा , दिल्लीतील केजरीवाल यांची मुत्सद्देगिरी , कल्याणकारी काम, केरळातील बांधिलकी अश्या अनेक बाबी भाजप सारख्या महाकाय ताकदीसमोर उभ्या राहू शकतात. इतर राज्यातील निकालासोबतच महाराष्ट्रातील महाविकास उमेदवाराचा पराभव सुद्धा प्रस्थापितांना धक्का पोहचवणारा आहे, या सर्व बाबी आम आदमीच्या आशा वाढवणाऱ्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या