पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले पार्थ चॅटर्जी यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून हटवले आहे. अटकेनंतर 5 दिवसांनी ममता यांच्या सरकारने ही कारवाई केली आहे. दरम्यान ईडीने मारलेल्या छाप्यात पार्थची जवळची सहकारी आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातून २७.९ कोटी रुपये रोख आणि ५ किलो सोने जप्त केले आहे.
अर्पिताला या रकमेबाबत विचारले असता, हे सर्व पैसे पार्थ चॅटर्जींचे असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, “पार्थ पैसे ठेवण्यासाठी या घराचा वापर करायचे. एवढी रोकड घरात ठेवली असेल याची मला कल्पनाही नव्हती”. तर या सर्व कारवाईनंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पार्थ यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली त्यामुळेच ममता सरकारने हा निर्णय घेतला.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, “अर्पिताने याआधी कधीही सांगितले नव्हते की तिच्या दुसऱ्या फ्लॅटमध्येही रोख रक्कम ठेवली आहे. मात्र आम्ही घरावर छापा टाकला तेव्हा आम्हाला 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले. 2000 रुपयांच्या नोटांपासून 50 लाख रुपयांचे बंडल आणि 500 रुपयांच्या नोटांपासून 20 लाख रुपयांचे बंडल बनवण्यात आले. 4.31 कोटी रुपयांचे सोनेही मिळाले. यामध्ये प्रत्येकी 1 किलोच्या 3 सोन्याच्या विटा, 6 बांगड्या आणि एक सोन्याचा पेन सापडला आहे. अर्पिताच्या फ्लॅटमधून 3 डायरीही सापडल्या आहेत, ज्यामध्ये कोडवर्डमध्ये व्यवहाराची नोंद केलेली आहे. तपास यंत्रणेने घरातून 2,600 पानांचे कागदपत्रही जप्त केले आहे, ज्यामध्ये पार्थ आणि अर्पिताच्या संयुक्त मालमत्तेचा उल्लेख आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Shivsena: सुषमा अंधारेंची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा
- Obc Reservation | 365 ठिकाणी OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया
- Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश, मिळाली उपनेतेपदाची जबाबदारी
- Arpita Mukharjee | अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरावर छापा; 29 कोटींची रोकड आणि सोनं जप्त
- Aurangabad : भाजप-शिंदे गटाने युती केली तरीही औरंगाबाद महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाच भगवाच फडकणार…
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<