इंधन दरवाढीचा निषेध करत इलेक्ट्रिक स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या ‘या’ महिला नेत्याला तुम्ही ओळखलं का ?

mamata

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये साधारण एप्रिलदरम्यान विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तारख्या येत्या काही दिवसात जाहीर होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तसे तसे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापू लागले असल्याचे चित्र दिसत आहे.

सत्ताधारी-विरोधक एकमेकांना खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे.देशभर सध्या इंधन दरवाढीचा मुद्दा गाजत आहे. हाच मुद्दा उचलत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी इलेक्ट्रिक स्कूटीवरून सचिवालयात पोहोचल्या व पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा निषेध केला.ममता बॅनर्जी स्कूटीच्या मागे बसल्या होत्या, तर पश्चिम बंगालचे नगरविकास मंत्री फिरहद हकीम स्कूटी चालवत होते. यावेळी सुमारे 15 इतर लोकही इलेक्ट्रिक वाहनांसह त्यांच्यासोबत होते. ममता बॅनर्जी हजारा ते कोलकाता मधील नबन्ना यादरम्यान हा प्रवास केला.

ममता बॅनर्जी केंद्र सरकारकडून होत असलेल्या पेट्रोलच्या दरवाढीचा सतत विरोध करत आहेत. अलीकडेच सर्वसामान्यांना दिलासा देताना पश्चिम बंगाल सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1 रुपये कपात करण्याची घोषणा केली होती.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या की, निवडणुका होण्यापूर्वी काही दिवस आधी केंद्र सरकार किंमती कमी करेल. रोज एलपीजी आणि डिझेलच्या किंमती वाढवत आहेतत्यामुळे सर्वसामान्य चिंता व्यक्त करत आहेत.

दरम्यान,गेल्या 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. या सत्तेला भाजपनं मोठं आव्हान निर्माण केलं असतानाच असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षानं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलं. त्यामुळे ममता बॅनर्जींसमोरील आव्हान आणखीच तीव्र झालं आहे.

भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार मुकाबला होईल, असेच सध्याचे चित्र आहे. अर्थात, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी हातमिळवणी केल्याने त्यांची आघाडीही मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या