पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला ममता बनर्जीच जबाबदार ; अमित शहांचा पलटवार

टीम महाराष्ट्र देशा : भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर कोलकात्यामध्ये रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून पलटवार केला आहे. पश्चिम बंगालमधील हिंसेचं कारण तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी आहेत असा आरोप अमित शाह यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. याचदरम्यान भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शोमध्ये तुफान राडा झाला. इतकेच नव्हे तर, यावेळी जाळपोळ आणि दगडफेकही झाली. त्यानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर ममता बनर्जी यांच्या टीकेला अमित शाह यांनी पलटवार केला आहे.

Loading...

संपूर्ण देशात ६ टप्यात मतदान झाले त्यावेळेस कुठेही हिंसाचार झाला नाही. मग केवळ पश्चिम बंगालमध्येच हिंसाचाराची घटना का घडली. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला तृणमूल कॉंग्रेस आणि ममता बनर्जी जबाबदार आहेत. दगडफेक करणारे कार्यकर्तेही तृणमूल कॉंग्रेसचेच होते. असे अमित शाह यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, पराभव दिसत असल्याने केवळ मतांच्या राजकारणासाठी तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. हिंसा झाली त्यावेळी विद्यासागर कॉलेजचं गेट बंद होतं, मग ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड कुणी केली? कॉलेजच्या आत कोण गेलं? कारण त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर होते. असेही त्यांनी म्हंटले. तसेच ममता बॅनर्जी उघडपणे धमक्या देत आहेत, बदला घेण्याची भाषा करत आहेत. राजकीय नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेण्यापासून रोखलं जात आहे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. असेही अमित शाह यांनी म्हंटले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली