नवी दिल्ली : काल (२७ एप्रिल) कोविडविषयक घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोल-डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला. तद्पश्चात पंतप्रधानांच्या आरोपावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चोख उत्तर दिले. असे असतांनाच आता याच मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banrjee) यांनी पंतप्रधान मोदींवर टिका केली आहे.
यासंदर्भात राज्य सचिवालयात पत्रकारांशी संवाद साधत असतांना ममता बॅनर्जी म्हणाल्या की,‘पंतप्रधान मोदींसोबतचा संवाद पूर्णपणे दिशाभूल करणारा होता.’ तसेच त्यांनी शेअर केलेले माहिती चुकीची असून आम्ही महिला तीन वर्षांपासून प्रत्येक लिटर पेट्रोल आणि डिझेलवर १ रुपये सबसिडी देत आहोत. त्याकरिता आम्ही १,५०० कोटी रुपये खर्च केले आहेत’, असे बॅनर्जी म्हणाल्या.
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की, ‘कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी इंधन दरवाढीवर बोलले नसते तर बरे झाले असते.’ तसेच हा त्यांचा अजेंडा होता, असेही बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
- “काही लोक आपल्या दरम्यान असलेला बंधुभाव…”, दिलीप वळसे पाटलांचा विरोधकांवर निशाणा
- “…या संकटाशी सर्वांनाच एकत्रित मुकाबला करण्याची गरज आहे”, संजय राऊत यांचे वक्तव्य
- “राजधानी दिल्लीत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न…”, शरद पवारांनी सुनावले
- “…सल्ला फक्त हिंदूंना आणि तुमच्या इफ्तार दावतचे जाहीर प्रदर्शन”, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना टोला
- IPL 2022 GT vs SRH : वानखेडेवर रंगला थरार..! शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत गुजरात विजयी; उमरानचा ‘पंच’!