ममता बॅनर्जी यांची भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू

BJP & Mamata

टीम महाराष्ट्र देशा :  तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आलेल्या आहेत. यादरम्यानचं त्यांनी भाजपविरोधात मोर्चेबांधणी आखली आहे. आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी यादीवरून मोदी सरकारला धारेवर धरणाऱ्या ममतांनी बुधवारी संसदेतच ठिय्या दिला होता.

भाजप विरोधी पक्षनेते त्याचबरोबर भाजपमधीलचकाही नाराज नेत्यांची देखील त्यांनी भेटी घेतल्या. भाजपमधील नाराज आणि मोदीविरोधक यशवंत सिन्हा, जेठमलानी आणि शत्रुघ्न सिन्हा यांचीही ममतांनी मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली होती. यासर्व नेत्यांना एकत्र येता यावं म्हणून १९ जानेवारी रोजी कोलकात्यात जाहीर सभेचे आयोजन तृणमूल काँग्रेसने केले असून त्याचे निमंत्रण देण्यासाठी विविध पक्षनेत्यांची भेट घेतल्याचे ममतांनी पत्रकारांना सांगितले. ममतांनी सकाळी संसदेत आल्यावर ‘बाजूला करण्यात आलेले’ भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची देखील ममतांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. ‘दिल्लीत आल्यावर आपण नेहमीच अडवाणींची भेट घेतो’, असे ममता या भेटीनंतर म्हणाल्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाचा आग्रह सोडल्यानंतर मायावती आणि ममतांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. यासंदर्भात, भाजपला हरवणे हे प्रथम लक्ष्य आहे. विरोधकांपैकी पंतप्रधान कोण होणार हे लोकसभा निवडणुकीनंतरच निश्चित केले जाईल, असे ममतांनी पत्रकारांना सांगितले.

यांनाही दिले आमंत्रण :

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांचीही ममतांनी १० जनपथवर जाऊन भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरोधात एकत्रित लढण्याचे आवाहन ममतांनी दोन्ही नेत्यांना केले. ममतांनी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांनाही जाहीर सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. सपाचे नेते रामगोपाल यादव, खासदार जया बच्चन, तेलुगु देसम तसेच अण्णा द्रमुकचे नेते, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आदींशीही ममतांनी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही मंगळवारी ममतांनी भेट घेऊन वीस मिनिटे संवाद साधला.

आता ‘त्या’ चार राज्याचे राज्यपाल काय निर्णय घेणार?

तेंव्हा काँग्रेसने शरद पवारांसोबत काय केले, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला सवाल

Loading...

 

Loading...

2 Comments

Click here to post a comment