‘हरल्या म्हणून काय झाले, ममतादीदींना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार आहे’

sanjay raut

मुंबई – पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं आहे. तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. आज ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर उद्या सर्व आमदारांचा शपथविधी होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र, याआधी ३ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७७ जागांवर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. सत्तेचा दावा करणाऱ्या भाजपला पराभूत करत ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं ममता दीदींवर पुन्हा अभिनंदनाचा वर्षाव होतोय तर भाजपवर टीका होत आहे.

ममता बॅनर्जी या आज राजभवनात शपथ घेणार आहेत. राजभवनात हा कार्यक्रम साधेपणाने केला जाणार आहे. कोरोना महामारी पाहता ममता बॅनर्जी यांनी शपथ समारंभाला 50 लोकांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, ममतांच्या मुख्यमंत्री होण्याला भाजपाने विरोध केला आहे. भाजपाचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी ममतांना मुख्यमंत्री होण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं सांगत विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हरल्या म्हणून काय झालं,ममता दीदींना बंगालच्या जनतेने स्वीकारलं आहे. त्यामुळे त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. आमच्या ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. हा विजय केवळ आणि केवल त्यांचा आहे. त्यांच्या समोर बडे नेते होते. त्या सर्वांना त्यांनी भूईसपाट केलं आहे. त्यामुळे हा निव्वळ त्यांचा विजय असून आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या