अखेर मल्या जाळ्यात अडकला, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

टीम महाराष्ट्र देशा- भारतात सुमारे नऊ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.प्रत्यार्पणाला मंजुरी देत न्यायालयाने मल्ल्याला दणका दिला  आहे .

लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला अखेर मंजुरी दिली आहे. आज न्यायालयात प्रत्यार्पणावर सुनावणी झाली.विजय मल्ल्या या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात देखील आव्हान देऊ शकतो. अपिल करण्यासाठी विजय मल्ल्याला 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला कदाचित उशीर देखील होऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.

स्त्री- पुरुषांना समान अधिकार, विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरू शकत नाही :सुप्रीम कोर्ट